शिव भोजन योजना ही सध्या कृषि उत्पन्न बाजार समिति पुलगांव द्वारा राबवली जाते. बाजारात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना अल्पदरात जेवण उपलब्ध करून दिल्या जाते. या योजनेअंतर्गत शेतका्यांना मात्र ५/- रु. मध्ये भोजन थाली उपलब्ध करून दिल्या जाते. ज्यामध्ये २ चपाती, १ कटोरी भाजी, १ कटोरी दाल आणि भात यांचा समावेश केला जातो. शेतकाऱ्यांना व शेतमजुरांना कमी दरात भरपेट जेवण दिल्या जावे. हा एकमात्र उद्देश याठिकाणी समितीमार्फत साध्य केला जातो.
