बाजार विभाग

लेखा विभाग

दैनदिन व्यवहाराचे नोंदी टॅली सॉफ्टवेअर मध्ये संगणीकृत करुन आर्थिक पत्रके तयार करणे तसेच बँक संबंधीत सर्व व्यवहाराचे कामकाज करणे. आर्थिक वर्षात अर्थसंकल्प पणन मंडळाकडे सादर करणे. शासनाला देय असलेले सर्व कर तसेच विविध देय भरणा करणे. लेखा विभागा संबंधित सर्व कामकाज करणे.

सांख्यकि विभाग

दैनंदिन बाजार भाव काढुन महाराष्ट्र राज्य कृषि, पणन मंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे, वार्षिक बाजार भाव भरणे.

आस्थापना विभाग

बाजार समितीचे आस्थापनेवरील सर्व कर्मचारी, रोजंदारी कामगार यांचे आस्थापना संबंधीत सर्व आदेश काढणे रजा खतावनी नोंदविने त्यांचे कामकाजाचे नियोजन करणे त्या संबंधीत सुचना पत्र देणे इत्यादी.

अनुज्ञप्ति विभाग

अ.क्र अनुज्ञप्तीचा प्रकार अनुज्ञप्ती फी चा वार्षिक दर रु. अनुज्ञप्ती नुतनीकरण फी चा वार्षिक दर रु. परवानाधारकांची संख्या
1 हमाल 6 4 12
2 अडत्या 200 180 10
3 मापारी 20 18 35
4 ब वर्गप्रक्रियाकार 200 180 11
5 मदतनीस 10 8 3
6 ब वर्ग व्यापारी 200 180 96

अ. खरेदी अनुज्ञप्ति - अर्जदाराचे दोन फोटो, अर्जदाराचा व्यवसायाचा ठिकाणच्या पत्याचा पुरावा, निवासाच्या ठिकाचा पुरावा, फर्म नोंदणीच्या पुराव्याची कागदपत्रे, बँक गॅरंटी/पतदार प्रमाणपत्र/रोख तारण बाबतचे पुरावे/ कागदपत्र, वचनपत्र रुपये ५००/- च्या बाँड पेपर वर, परिशिष्टामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे आवश्यक ते मुद्रांकित केलेल्या करारनाम्याची पत्र रुपये ५००/- च्या बाँड पेपर वर, चांगल्या वर्तणुकीबद्दल दोन दाखले (राजपत्रीत अधिकार/आमदार/ बा.स. सदस्य)

आ. अडत अनुज्ञप्ति - अर्जदाराचे दोन फोटो, अर्जदाराचा व्यवसायाचा ठिकाणच्या पत्याचा पुरावा, निवासाच्या ठिकाचा पुरावा, फर्म नोंदणीच्या पुराव्याची कागदपत्रे, बँक गॅरंटी/पतदार प्रमाणपत्र/रोख तारण बाबतचे पुरावे/ कागदपत्र, वचनपत्र रुपये ५००/- च्या बाँड पेपर वर, परिशिष्टामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे आवश्यक ते मुद्रांकित केलेल्या करारनाम्याची पत्र रुपये ५००/- च्या बाँड पेपर वर, चांगल्या वर्तणुकीबद्दल दोन दाखले (राजपत्रीत अधिकार/आमदार/बा.स. सदस्य)

इ. मदतनीस अनुज्ञप्ति - अर्ज, आधार कार्डची प्रत, परिशिष्टामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे आवश्यक ते मुद्रांकित केलेल्या करारनाम्याची पत्र रुपये ५००/- च्या बाँड पेपर वर, फर्मचे शिफारस पत्र, चांगल्या वर्तणुकीबद्दल दोन दाखले (राजपत्रीत अधिकार/आमदार/बा.स. सदस्य)

ई. मापारी अनुज्ञप्ति - अर्जदाराचे दोन फोटे, निवासाच्या ठिकाणचा पुरावा, शारीरिक क्षमता पात्रतेचा प्रमाणपत्र, चांगल्या वर्तणुकीबद्दल दोन दाखले (राजपत्रीत अधिकार/आमदार/बा.स. सदस्य), परिशिष्टामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे आवश्यक ते मुद्रांकित केलेल्या करारनाम्याची पत्र रुपये ५००/- च्या बाँड पेपर वर.

उ. हमाल अनुज्ञप्ति - अर्जदाराचे दोन फोटे, निवासाच्या ठिकाणचा पुरावा, शारीरिक क्षमता पात्रतेचा प्रमाणपत्र, चांगल्या वर्तणुकीबद्दल दोन दाखले (राजपत्रीत अधिकार/आमदार/बा.स. सदस्य), परिशिष्टामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे आवश्यक ते मुद्रांकित केलेल्या करारनाम्याची पत्र रुपये ५००/- च्या बाँड पेपर वर.

अडत /खरेदी तपासणी विभाग

दैनंदिन अडत/खरेदी बिलांची माहवार तपासणी केली जाते.

शेतमाल तारण विभाग

शेतक-यांना त्यांचे शेतमाल तारणावर तारण कर्ज देण्यात येते. हंगामाच्या काळात बाजार मध्ये शेतमालाची आवक वाढलेली असते बरेचवेळा आवक जास्त असल्याने भाव कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात शेतक-यांना शेतमाल कर्ज भावाने कावा लागुनये व त्यांची पैशाची गरज भगविण्यासाठी या करात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंळाचे निर्देशनाने बाजार समिती स्व:फंडातुन शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. या विभागात शेतक-यांने शेतमालवार आवश्यक त्या कागद पत्राची पूर्तता करुण तारण कर्ज देण्यात येते.

रोखपाल

बाजार समिती मधील मार्केट फी, सुपरव्हिजन फी, शेतमाल तारण, गाळा भाडे व इतर मिसलेनियस भरणा स्विकारण्यात येतो. रोख विभागातील रोख, धनादेश (चेक), नेट बँकीग द्वारे भरणा झालेल्या रकमांच्या पावत्या बनवून सदर भरणा बाजार समितीचे बँक खाते मध्ये दैनंदीन जमा केल्या जातो. या सर्व व्यवहाराची नोंद कॅश बुकला घेतल्या जाते.

डिमांड विभाग

परवानाधारक अडते व खरेदीदार मार्केट यार्डवर खरेदी - विक्रीच्या नोंदणी धान्य डिमांड विभागात होते, व मार्केट फी व सुपरव्हिजन फी ची आकारणी या विभागांतर्गत होते.

धान्य विभाग

धान्य विभागात शेतक-यांन मार्फत येणा-या शेतमालाचे विक्री ही खुल्या लिलाव पध्दतीने करण्यात येते. सदर लिलाव हा परवानाधारक खरेदीदार, अडते व शेतकरी यांचा समोर होते. परवानाधारक मापा-यां कडुन शेतमालाचे अचुक मोजमाप करण्यात येते. बाजार समितीने नेमलेल्या कर्मचा-यां मार्फत सदर लिलावाची सौदा पट्टया देण्यात येते. शेतक-यांना त्याचे शेतमालाची रक्कम अडत्यां कडून मिळते.

दुकान भाडे विभाग

बाजार समितीमध्ये दुकाने अडते/व्यापारी यांना मासिक भाड्याने दिलेली आहे.